52 शक्तीपीठांपैकी एक; या रहस्यांनी भरलेले आहे कामाख्या देवीचे मंदिर
पुराणानुसार, भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीचे ५१ शरीराचे भाग कापले होते आणि हे भाग विविध ठिकाणी सोडले. हे भाग जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठ तयार झाले. यापैकीच एक शक्तीपीठ म्हणजे कामाख्या देवीचे मंदिर. येथे देवीच्या मूर्तीची पूजा केली जात नाही, तर तिच्या योनीची पूजा केली जाते.
कामाख्या देवीचे मंदिर विशेषतः जून महिन्यात त्याच्या विशेषतेसाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की २२ ते २५ जून पर्यंत मंदिर बंद केले जाते कारण या काळात देवी सतीला मासिक पाळी येते.
या काळात पुरुषांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही आणि मंदिराच्या आत एक पांढरा कापड ठेवला जातो, जो तीन दिवसांत लाल होतो. त्याला "अंबुवाची वस्त्र" म्हटले जाते. हे कापड भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो
कामाख्या देवी मंदिर तंत्र साधनेसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. इथे जर कोणी काळ्या जादूच्या आहारी गेला तर तांत्रिक ते दूर करण्याचे काम करतात
दरवर्षी कामाख्या देवीच्या मंदिरात एक मोठा मेळा भरतो, ज्याला "अंबुबाची मेळा" असे म्हणतात. हा मेळा जून महिन्यात आयोजित केला जातो. या मेळ्यात अनेक भाविक त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर कन्या भोजनाची व्यवस्था करतात. या मेळ्यात काही लोक प्राण्यांचा बळी देतात, मात्र हा बळी मादी प्राण्यांचा दिला जात नाही