लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कायमच जंक फूड खायला खूप जास्त आवडते. कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा घरात जेवण बनवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी कायमच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच विकतचे तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले नाही. यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. आज आम्ही तुम्हाला जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला कोणत्या आजारांची लागण होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यासंबंधित १०० टक्के वाढतात 'हे' गंभीर आजार, लठ्ठपणा- मधुमेहामुळे होईल शरीराचे नुकसान

आजकाल अतिप्रमाणात सर्वच जंक फूडचे सेवन करतात. सतत वडापाव, पिझ्झा, बर्गर इत्यादी पदार्थांचे आवडीने सेवन केले जाते. पण मैदा असलेले पदार्थ खाल्ल्यास शरीराला अजिबात फायदा होत नाही.

जंक फूडचे सेवन करणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि वजन झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकतो.

शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण करतो. याशिवाय कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तभिसरण व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.

सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे लहान वयातच हृदयरोगांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे जंक फूड खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.

सतत तिखट आणि अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव येतो. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन करण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे सतत बाहेरचे खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत.






