पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा समारोप समारंभ ८ सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी भारताच्या पॅरा खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये २९ पदकांची कमाई केली. यामध्ये ७ सुवर्ण, ९ रौम्य आणि १३ कास्यपदकांचा समावेश होता. भारताच्या खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकचा रेकॉर्ड मोडीत दमदार कामगिरी करत २९ मेडल नावावर केले. यासह भारत २९ पदकांसह १८ व्या क्रमांकावर राहिला. भारताचे अनेक पॅरा खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये युवा खेळाडूंना प्रेरणादायी कामगिरी करून दाखवली. यामध्ये शीतल देवी, नितेश कुमार, प्रवीण कुमार, सिमरन शर्मा अशा अनेक भारताच्या खेळाडूंनी युवा खेळाडूंना प्रेरणा दिली आहे, यामधील आमच्या टॉप १० खास पॅरा ॲथलेटिक्स कोणते यावर एकदा नजर टाका.
भारतीय युवा खेळाडूंना प्रेरणा देणारे भारताचे पॅरा खेळाडू - फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मरियप्पन थांगावेलू या भारताचा एक उंच उडी खेळाडू आहे त्याने सलग त्याच्या तीन पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये ३ मेडल नावावर केले आहेत, यामध्ये २ सुवर्ण आणि १ कांस्यपदक नावावर केले आहे.
भारताची स्टार धावपटू सिमरन शर्मा हीचा लहानपणापासूनच जीवनाचा प्रवास हा खडतर होता, त्यानंतर तिचे पती गजेंदर यांची साथ मिळाल्यानंतर तिने पॅरालिम्पिकमधील पहिले मेडल मिळवले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा पॅरा जुडो खेळाडू कपिल परमार हा याचा विजेच्या जोरदार धक्क्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये सहा महिने राहावे लागले होते, यावेळी त्याने त्याची दृष्टी गमवावी लागली होती. दृष्टीहीन पॅरा जुडोमध्ये त्याने भारताला कांस्यपदक मिळवून दिले.
पॅरालिम्पिकमधील पहिली तिरंदाज जिने तिचे दोन्ही हात गमावलेले असताना शितल देवीने पॅरिसमध्ये कांस्यपदक मिळवून दाखवले. तिने भारताच्या अनेक पॅरा तिरंदाजांना प्रेरणा दिली आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा उंच उडीपटू प्रवीण कुमार याचा जन्म झाल्यानंतरच त्याचा एक पाय लहान असल्यामुळे त्याला नीट चालणं कठीण होत अशा परिस्थितीमध्ये त्याने पॅरिस पॅरालिम्पिक भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सुवर्ण पदक विजेता नितेश कुमार याने २००९ मध्ये रेल्वे अपघातामध्ये त्याने त्याचा एक पाय गमावला होता, त्यानंतर अतोनात प्रयत्न आणि मेहनत घेऊन त्याने पॅरिसमध्ये सुवर्ण पदक मिळवले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया