भारताने फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली. त्याचबरोबर त्याने विश्वचषकातील त्याची सर्वात्तम खेळी खेळला.
भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वविजेता झाला. त्याचबरोबर हिटमॅनने त्याच्या T-२० फॉरमॅटमधून निव्रुत्तीही घेतली आहे.
जसप्रीत बुमराह नेहमीच्या जेव्हा भारताचा क्रिकेट संघ अडचणीत असतो तेव्हा तो त्यांच्या गोलंदाजीने चमत्कार करून भारताला संकटातून बाहेर काढतो.
T-२० विश्वचषकात अर्शदीप सिंहने चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने विश्वचषकामध्ये जसप्रीत बुमराहची सुद्धा साथ दिली.
सूर्यकुमार यादव फायनलच्या सामन्यात फार मोठी खेळी खेळू शकला नाही परंतु त्याने घेतलेला कॅच प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे.
भारताचा विकेटकिपर रिषभ पंतने आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन केले. त्याने त्याच्या खेळीने भारताच्या संघाला मजबूत स्थितीमध्ये ठेवण्यास मदत झाली.