गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब राहिलेली ईशा गुप्ताने आपल्या फोटोंने चाहत्यांचे लक्ष वेधलेय. कायमच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह राहणाऱ्या ईशाने काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर काही नवीन फोटोशूट शेअर केलेले आहेत. तिच्या फॅशनने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.
Esha Gupta Photos
चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारणाऱ्या ईशा गुप्ताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिच्या सौंदर्याची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते. नुकताच अभिनेत्रीने तिचा ३९ वा वाढदिवस सेलिब्रेट केला.
वाढत्या वयाप्रमाणे ईशाच्या सौंदर्यात दिवसेंदिवस आणखीनच भर पडत चालली आहे. इन्स्टाग्रामवरील तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधलेय. सध्या अभिनेत्री दुबईमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
दुबईतल्या एका हॉटेलमध्ये स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट केले असून तिच्या सौंदर्याचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. अभिनेत्रीच्या निखळ सौंदर्याची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.
कॉफी कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट दिसत आहे. तिने वेअर केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ईशा कायमच सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमुळे चर्चेत असते. ती कायमच ती तिची फिगर फ्लॉन्ट करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर मनमोकळेपणाने फॉलोअर्ससोबत फोटो शेअर करत असते.
२०१२ मध्ये ईशाने क्राइम थ्रिलर ‘जन्नत २’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अभिनेत्रीने ‘राज ३’, ‘रुस्तम’, ‘बादशाहों’ आणि ‘टोटल धमाल’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.