जगभरात Cannes Film Festival 2026 सोहळ्यासाठी भन्नाट क्रेझ पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी अभिजात मराठीची टीम उपस्थित राहिली आहे. दरम्यान, या सगळ्या कलाकारांनी आपल्या अफलातून पारंपरिक Costume मधून मराठी मातीचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, प्राजक्ता माळीच्या चाहत्यांची एक वेगळीच हवा आहे. प्राजक्ताचा Look पाहून तिच्या चाहत्यांना तिच्या सौंदर्याचे वेड लागले आहे.
Prajakta Mali at Cannes Saree Look. (फोटो सौजन्य - Social Media)

निळ्या रंगाच्या साडीमध्ये प्राजक्ताने फोटोशूट केला आहे. फ्रांसच्या समुद्रकिनारी हा Photoshoot करण्यात आला आहे.

प्राजक्ताला पाहून चाहत्यांना तिच्या सौंदर्याचे वेड लागले आहे. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे मनभरून कौतुक केले आहे.

प्राजक्ताने कॅप्शनमध्ये "काही लिहायची गरज? फक्त… मिळत असलेल्या सगळ्या प्रेमाबद्दल… खूप प्रेम" असे नमूद केले आहे.

एकंदरीत, या Cannes Film Festival 2026 मध्ये प्राजक्ताला मराठी सिनेचाहत्यांकडून जे प्रेम मिळाले, त्या प्रेमाबद्दल ती कृतज्ञ असल्याचे तिने कॅप्शनच्या माध्यमातून सांगितले आहे.

Cannes मध्ये मराठी हवा करून झाल्यानंतर Prajakta Mali ने France च्या समुद्रकिनारी Photoshoot केला आहे.






