पहिल्या प्रेमाची आठवण – ‘प्रेम म्हणजे काय असतं ?’चा ट्रेलर रिलीज
पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या ‘प्रेम म्हणजे काय असतं?’ (Prem hanje Kay Asat) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. (Prem Mhanje Kay Asat Trailer) प्रेम म्हणजे काय हे सांगत प्रेमाची हळुवार भावना उलगडणारा हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तख्त प्रॉडक्शन (Takht Productions) यांनी ‘प्रेम म्हणजे काय असतं?’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद दत्तात्रय इंगवले (Prasad Ingawale) यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. ऋतुजा टंकसाळे, पायल कदम, सूरज माने अशा नव्या दम्याच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट झाले. मात्र याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू ‘प्रेम म्हणजे काय असतं?’ या चित्रपटातून मांडला जाणार आहे.