राजापूर शहरात मागील दोन वर्षांपासून ‘महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र’ या नावाने एक संस्था स्थापन करण्यात आली होती. स्थानिक महिलेला हाताशी धरून कोल्हापूर येथील महिलेने उद्योगाच्या नावाखाली बँक महिलांच्या नावावर बँकेचे कर्ज केले. त्यातून मशीन खरेदी करून त्याचे हफ्ते भरण्याचे आश्वासन दिले. पण सुरवातीला काही हफ्ते भरल्यानंतर या महिलांनी पैसे भरण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलांनी न्यायासाठी २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा दिला आहे. या परिसरातील अनेकी महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता असून पोलीस विभागाने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या महिलांनी केली आहे.