मावळ तालुक्यात महायुतीला जोरदार तडे गेलेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरून भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आमनेसामने आले आहेत. भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करत भेगडेंनी उमेदवार जाहीर केले, तर दुसरीकडे युतीबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा करत शेळकेंनीही राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केले.युती नाकारल्यानंतर शेळकेंनी भेगडेंच्या राजकीय वजनावरच सवाल उपस्थित करत “भाजपमध्ये भेगडेंना कोण विचारतंय?” असा थेट टोला लगावला.स्वबळ की युती, या वादामुळे मावळचं राजकारण चांगलंच तापलं असून मामा-भाचे वाक् युद्ध आता उघडपणे रस्त्यावर आलं आहे.