कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवत सर्वात कमी वयाची म्हणजे 23 वर्षाची ॲड. मानसी सतीश लोळगे नगरसेविका बनलीये. प्रभाग क्रमांक 19 ब मधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मानसीने निवडणूक लढवली होती..या निवडणुकीत मानसीने विजय मिळवल्याने ती महापालिकेत सर्वात तरुण वयाची नगरसेविका ठरलीये..त्यामुळे सर्वात कमी वयाची नगरसेविका म्हणून मानसी चर्चेत असून सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे..वडील सतीश लोळगे हे माजी नगरसेवक असल्याने आपल्या वडीलांचा राजकीय वारसा मानसीने पुढे नेला आहे.दरम्यानआपल्या वडिलांचा राजकीय अनुभव आणि वकिली क्षेत्रातील ज्ञानातून कोल्हापूरचा विकास साधण्याचं स्वप्न मानसीने डोळ्यांसमोर ठेवलंय.शिवाययुवा वर्गातील ऊर्जा घेऊन महिला, युवकांच्या समस्या सोडवण्याबरोबर कोल्हापूरला स्मार्ट सिटी बनवण्याचा निर्धार तिने केलायं.