डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाने अचानक रस्ता बंद केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या रस्ता बंदीमुळे परिसरातील तब्बल ११५ कुटुंबांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दैनंदिन ये-जा, शाळकरी मुले, वृद्ध व रुग्ण यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून लोकप्रतिनिधी व पोलिसांकडे वारंवार विनवणी करूनही जागा मालक कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर संतप्त नागरिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.