संपूर्ण महाराष्ट्रात नागपंचमी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला खूप जास्त महत्व आहे. नाग या प्राण्याबद्दल समाजामध्ये आदर आणि पूज्य भावना निर्माण करण्यासाठी नागपंचमी साजरा केली जाते. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार नाग हे भगवान शंकराचे अलंकार मानले जातात आणि श्रीविष्णूचा शयनकाळही शेषावर असतो. त्यामुळे श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमीला खूप जास्त महत्व आहे. याशिवाय अशी मान्यता आहे की नागपंचमीच्या दिवशी तव्यावर भाजलेले पदार्थ बनवले जात नाहीत. नागाच्या नैवेद्यामध्ये शिजवलेले किंवा उकडलेले पदार्थ असतात. त्यामुळे यंदाच्या नागपंचमीला हे पारंपरिक पदार्थ नक्की बनवा. (फोटो सौजन्य – pinterest)
नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

नागपंचमी सणाला तवा आणि सुरीचा अजिबात वापर केला जात नाही. त्यामुळे घरात शिजवलेले किंवा उकडवलेले पदार्थ बनवले जातात. त्यामुळे नागाच्या नैवेद्यासाठी पुरणाचे दिंडे बनवू शकता.

कोकणात हळदीच्या पानांवर तांदळाची उकड, ओले खोबरे आणि गूळ-वेलचीचे सारण भरून चविष्ट पातोळ्या बनवल्या जातात. हळदीच्या पानांचा सुगंध पातोळ्यांची चव आणखीनच वाढवतो.

नागपंचमीला शिजवलेले किंवा उकडवलेले पदार्थ बनवले जातात. त्यामुळे तांदळाची खांडवी तुम्ही बनवू शकता. तांदळाचे पीठ, ओले खोबरे, गूळ आणि पाणी करून बनवलेला चविष्ट पदार्थ सगळ्यांचं आवडेल.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात कानोले, फुणके किंवा गव्हाची खीर असा नैवेद्य बनवला जातो. सणावारांच्या दिवसांमध्ये बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात.

काही भागांमध्ये शेवयांची खीर किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांची खीर सुद्धा बनवू शकता. घरी बनवलेले गोड पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतात.

