जूनचा महिना हा Pride Month म्हणून देखील साजरा केला जातो. हा महिना LGBTQ समुदायासाठी अभिमानाचा आणि समानतेचा उत्सव असतो. याच पाश्वभूमीवर आज आपण भारतातील पहिल्या वाहिल्या समलैंगिक राजकुमाराबद्दल जाणून घेणार आहोत. Prince Manvendra Singh Gohil असे या राजकुमाराचे नाव आहे. 2006 साली एका लोकल वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मानवेंद्र सिंह गोहिल यांनी जगजाहीर केले की ते गे आहेत. चला या भारतातील पहिल्या वाहिल्या समलैंगिक राजकुमाराची गोष्ट जाणून घेऊयात.
भारतातील पहिला समलैंगिक राजकुमार (फोटो सौजन्य: @PrinceRajpipla x.com)
23 सप्टेंबर 1965 रोजी जन्मलेले राजकुमार मानवेंद्र सिंह गोहिल हे भारतातील पहिले समलैंगिक राजकुमार आहेत. 2006 साली ते समलैंगिक आहेत,अशी माहिती लोकल वृत्तपत्राला दिली.
1965 साली जन्मलेले राजकुमार मानवेंद्र सिंग गोहिल हे राजपिपल्याच्या महाराजाचे पुत्र आणि त्या महान घराण्याचे वारसदार आहेत.
जानेवारी 1991 मध्ये, त्यांचे लग्न मध्य प्रदेशातील झाबुआ राज्यातील राजकुमारी चंद्रिका कुमारीशी झाले, परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही आणि लवकरच १९९२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
लहानपणी प्रिन्स मानवेंद्रला त्याच्या लैंगिकतेशी संघर्ष करावा लागला. पुढे 2002 पर्यंत त्यांना कळले की ते समलैंगिक आहे. त्यांच्या पालकांनी त्यांना ब्रेन सर्जरी किंवा शॉक थेरपीने बरे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची समलैंगिकता गुप्त ठेवली. मात्र 2006 मध्ये प्रिन्स मानवेंद्र यांनीच आपल्या समलैंगिकतेबद्दल भाष्य केले.
आपण समलैंगिक आहोत याबद्दल प्रिन्स मानवेंद्र यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. सोशल मीडियाद्वारे ते ड्यूक डीअँड्रे रिचर्डसनशी जोडले गेले आणि पुढे 2013 मध्ये त्यांनी त्याच्याशी लग्न केले.