हारिस रऊफच्या 'त्या' कृतीला बुमराहने दिले चोख उत्तर (Photo Credit- X)
IND vs PAK: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत सर्व चाहत्यांची मने जिंकली. विशेषतः, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चर्चेचा विषय ठरला. त्याने केवळ घातक गोलंदाजीच केली नाही, तर पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफला बोल्ड करत त्याच्या ‘त्या’ वादग्रस्त कृतीला खास शैलीत उत्तर दिले.
बुमराहने रौफची विकेट घेतल्यानंतर केलेला हावभाव व्हायरल होत आहे. चाहत्यांनी त्याला ‘कर्मा’ म्हणत, या सेलिब्रेशनचे कौतुक केले. कारण, भारत-पाकिस्तान सुपर ४ सामन्यात रौफनेच हावभाव सुरू केला होता. त्यावेळी, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना, काही भारतीय चाहत्यांनी ‘विराट कोहली’ असे म्हणून त्याला चिडवले होते. त्याला उत्तर म्हणून हारिस रौफने हाताने ‘फायटर जेट क्रॅश’ झाल्याचा हावभाव केला होता. या आक्षेपार्ह कृतीमुळे आयसीसीने त्याला त्याच्या सामन्याच्या ३० टक्के शुल्काचा दंड ठोठावला होता.
Bumrah celebration against Rauf
Owned that mulla.
Showed him how rafales destroyed porki bases. 🔥🔥
Gand mara mc rauf teri maa ki chut pic.twitter.com/2H5LBlXdmm — Wbg Suk (@SukkkWBG) September 28, 2025
आजच्या अंतिम सामन्यात रौफला बाद केल्यानंतर बुमराहने असाच हावभाव करून त्याला जशास तसे उत्तर दिले, ज्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानने साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांच्या जोडीने जलद आणि मजबूत सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. साहिबजादा फरहानने ३८ चेंडूत ५७ धावा केल्या, तर फखर जमान ३५ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. भारताविरुद्ध फरहानचे हे सलग दुसरे अर्धशतक होते.
या दोघांनंतर मात्र कोणताही पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर तग धरू शकला नाही. लागोपाठ विकेट पडू लागल्या आणि संपूर्ण संघ १९.१ षटकांत १४६ धावांवर ऑलआउट झाला. भारताकडून कुलदीप यादवने भेदक गोलंदाजी केली.