फोटो सौजन्य:iStock
भारतात कावासाकीने विविध सेगमेंटमध्ये दमदार जाणीव पॉवरफुल बाईक्स ऑफर केल्या आहेत. अलीकडेच कंपनीने आपली दोन नवीन ऑफ-रोडर बाईक्स – 2025 Kawasaki KLX 230 आणि 2025 Kawasaki KLX 230R S चा नवीन वर्जन बाजारात सादर केला होता. आता GST दरांमध्ये झालेल्या बदलामुळे या बाईक्सच्या किमतीत मोठी घट करण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात, कोणत्या मॉडेलची किती किंमत कमी झाली आहे.
कंपनीने ज्या दोन ऑफ-रोड बाईक्स भारतात ऑफर केल्या आहेत, त्या म्हणजे 2025 Kawasaki KLX 230 आणि 2025 Kawasaki KLX 230R .या दोन्ही बाईक्सच्या किमतीत GST दर कमी झाल्यामुळे घट करण्यात आली आहे.
लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?
2025 Kawasaki KLX 230: या बाईकच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे ₹16,000 ची घट झाली आहे.
2025 Kawasaki KLX 230R S: या बाईकची किंमत ₹15,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
पूर्वी या दोन्ही बाईक्सवर इतर बाईक्सप्रमाणेच 28% GST आकारण्यात येत होता. पण GST दरात बदल झाल्यानंतर आता फक्त 18% GST लागू केला जात आहे. त्यामुळे एक्स-शोरूम किंमतीत हजारों रुपयांची बचत ग्राहकांना होणार आहे.
Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी
2025 Kawasaki KLX 230: नवीन एक्स-शोरूम किंमत – ₹1.84 लाख
2025 Kawasaki KLX 230R S: नवीन एक्स-शोरूम किंमत – ₹1.79 लाख
या बाईकमध्ये 233cc चा सिंगल सिलेंडर, 2 व्हॉल्व्ह इंजिन देण्यात आला आहे, जो 17.85 bhp ची पॉवर आणि 18.3 Nm टॉर्क जनरेट करतो. बाईकला 6-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे, जे ऑफ-रोडिंगसाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स देते.
Kawasaki KLX 230 आणि KLX 230R S या बाईक्समध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहे. पूर्णतः अॅडजस्ट होणारे सस्पेन्शन,अधिक ग्राउंड क्लीयरन्स, जास्त सस्पेन्शन ट्रॅव्हल, ऑफ-रोडिंग टायर्स, आणि स्पोक व्हील्स. या सर्व गोष्टींमुळे या बाईक्स विशेषतः रफ-टेरेन आणि ट्रेल रायडिंगसाठी उपयुक्त ठरतात.
2025 Kawasaki KLX 230 ही बाईक भारतात खास ऑफ-रोडिंग प्रेमींना लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आली आहे. याचे थेट स्पर्धक म्हणून Hero Xpulse 200 4V Pro बघितली जाते, जी ऑफ-रोडिंग सेगमेंटमध्ये एक मजबूत पर्याय आहे.