
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडते 'ही' भाजी! आतड्यांमधील गॅस- मधुमेह होईल कायमचा नष्ट
निरोगी राहण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
शेवग्याच्या पानांचे फायदे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडणारी भाजी कोणती?
दैनंदिन आहारात खाल्लेले जाणारे सर्वच पदार्थ शरीरावर थेट परिणाम करतात. त्यामुळे आहारात कायमच पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. त्यातील शरीरासाठी वरदान मानली जाणारी भाजी म्हणजे शेवग्याची पाने. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा रोजच्या आहारात शेवग्याच्या भाजीचे आणि शेंगांचे सेवन करतात. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी, कॅल्शियम, विटामिन ए आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा शेवग्याच्या पानांची भाजी किंवा शेंगांचे सूप बनवून प्यावे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधरण्यासाठी, संधिवात, सांधेदुखी, कोरडी त्वचा किंवा पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. यामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आणि इतर घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला वेगवेगळ्या साथीच्या आजारांची लागण होते. आजारांची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. हाडांची ताकद वाढवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. या पानामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. तसेच कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. थंडीत हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांची भाजी बनवून खावी.यामुळे हाडांची घनता सुधारण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा सूप बनवून प्यावा.
हल्ली पचनाच्या समस्या वाढू लागल्या आहेत. थंडीत शरीराची पचनक्रिया मंदावते. यामुळे ऍसिडिटी, अपचन आणि गॅसची समस्या वाढून पोटाचा त्रास वाढतो. अशावेळी शेवग्याच्या पानांची भाजी किंवा रस प्यावा. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा रस प्रभावी ठरेल. थकवा अशक्तपणा कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सूप बनवून प्यावे.
सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी वेगवेगळे स्किन केअर तर कधी डाएट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वारंवार उद्भवणाऱ्या अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम आणि ऍक्ने येत नाही. याशिवाय तुमची त्वचा कायमच चमकदार आणि सुंदर दिसते.
वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांचा रस प्यावा. यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय उच्च रक्तदाब कायमच नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांची भाजी किंवा शेंगांचे सूप बनवून प्यावे.