
रक्तातील साखरेची पातळी कायमच राहाल नियंत्रणात! रोज प्या एक कप ब्लॅक कॉफी
मधुमेह होण्याची कारणे?
ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे?
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय?
जगभरात मधुमेहाने असंख्य लोक त्रस्त आहेत. हा आजार झाल्यानंतर आयुष्यभर गोळ्या औषध खावी लागतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे फार आवश्यक आहे. दैनंदिन आहारात होणाऱ्या लहान मोठ्या चुकांमुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. मसालेदार, तेलकट, अतिगोड पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचते. बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने हेच छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात आणि संपूर्ण आरोग्य बिघडतात. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे दिसू लागतात. मधुमेह हा लाईफस्टाईलसंबंधित बदलांमुळे होणारा आजार आहे. शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिनचा योग्य वापर न झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढ जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेहाची लक्षणे कोणती? मधुमेह झाल्यानंतर ब्लॅक कॉफीचे सेवन का करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)
झोपण्याआधी चावून खा आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली वेलची, संपूर्ण आरोग्याला होतील भन्नाट फायदे
बऱ्याचदा जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती असते. पण कॉफीच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढण्याचा वेग अतिशय कमी होऊन जातो. यामध्ये कमी कॅलरीज असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लॅक कॉफी पिणे अतिशय उत्तम पर्याय आहे. याशिवाय हे पेय शरीरासाठी सुरक्षित मानले जाते. ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे टाइप २ मधुमेह होण्याचा धोका साधारणपणे २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊन जातो.
सकाळी उठल्यानंतर ब्लॅक कॉफी प्यायल्यास मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी प्यावी. यामुळे चरबी झपाट्याने वितळून जाते. वजन नियंत्रणात राहिल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स फ्री रेडिकल्स कमी करून पेशींचे नुकसान होऊ देत नाहीत.
थंडीमुळे सांधे होतायत कडक? हिवाळ्यामध्ये ‘हे’ आरोग्य मंत्र तुमच्या हाडांची – सांध्यांची घेतील काळजी
ब्लॅक कॉफी सकाळच्या नाश्त्यात किंवा वर्कआउट करण्याआधी प्यावी. यामुळे शरीराची ऊर्जा वाढते आणि व्यायाम करताना फॅट कमी होण्यास मदत होते. ब्लॅक कॉफी चवीला कडू लागते. त्यामुळे कॉफीचा कडवटपणा कमी करण्यासाठी साखरेऐवजी दालचिनी पावडर किंवा तूप मिक्स करून प्यावे. तसेच चवीसाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.
Ans: मधुमेह एक असा आजार आहे जिथे रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप वाढते. ग्लुकोज ऊर्जेसाठी आवश्यक आहे आणि इन्सुलिन नावाचा हार्मोन या ग्लुकोजला पेशींमध्ये पोहोचवतो.
Ans: वारंवार लघवीला होणे, सतत तहान लागणे, तोंड कोरडे पडणे
Ans: टाइप 1 मधुमेह, टाइप 2 मधुमेह