अनंत अंबानीची वधू राधिका मर्चंटच्या लग्नाचा फर्स्ट लूक समोर आला आणि यावेळी सर्वांचे डोळेच दिपले. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची धाकटी सून राधिका डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांच्या डिझायनर लेहेंग्यात दिसली. लग्नाच्या पेहरावामध्ये राधिका मर्चंट खूपच सुंदर दिसत असून तिचा हा लुक कसा आहे याबाबत आपण जाणून घेऊया. राधिका आणि अनंतने 12 जुलै रोजी लग्न केले आणि या लग्नासाठी देशविदेशातून अनेक पाहुणे आले होते. मात्र बाजी मारली ती नवरीच्या लुकने (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नवरी राधिकाचा क्लासी लुक पाहूनच दिपले सर्वांचे डोळे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
शेवटी राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाचा दिवस आला. अनंतची वधू तयार झाली आणि 16 श्रृंगार पाहून सर्वांचेच डोळे दिपले. राधिका मर्चंटने तिच्या लग्नाचा ड्रेस म्हणून क्रीम, लाल आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा निवडला होता.
सर्वप्रथम हे जाणून घ्या की प्रसिद्ध बॉलीवूड डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी हा लेहंगा डिझाइन केला आहे. राधिकाचा वेडिंग ड्रेस शरीन आणि फॅशन स्टायलिस्ट शनाया कपूरने स्टाइल केला आहे. हा लेहंगा वजनाला आणि दिसायलाही अत्यंत भारी आहे.
राधिका मर्चंटने 'पनेटर' लेहेंगा परिधान केला आहे. म्हणजे गुजराती पोशाख. जिथे लाल आणि पांढरे रंग वापरले जातात. गुजराती परंपरेत हा रंग शुभ मानला जातो
या लेहंग्यावर आयव्हरी जरदोसी कट-वर्क करण्यात आले आहे. हा एक घागरा आहे ज्यामध्ये दुपट्ट्यासाठी 5 मीटर लांबीचा दुपट्टा दिला जातो. हा टिश्यू शोल्डरचा दुपट्टा आहे
राधिकाच्या गुजराती लेहेंगासाठी फुले, स्टोन्स, सिक्वीन्स, कॉपर टिक्की आणि रेड सिल्कचा वापर करण्यात आला आहे. पदरावर खूप बारीक आणि कट काम करण्यात आले आहे
यासह राधिकाने हिऱ्यापाचूचे दागिने घालून अधिक शोभा वाढवली आहे. राधिका एखाद्या महाराणीइतकी सुंदर दिसली. तर हातात तिने लाल चुडा भरला आहे
लाल लिपस्टिक, काजळ, आयलायनर असा तिचा लुक पाहून तिच्या चेहऱ्यावरील नजरही हटत नाहीये. तर तिने वेगवेगळ्या पोझमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे