पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी एकूण 27 पदके जिंकली आहेत. यामध्ये 6 सुवर्ण आणि 9 रौम्य पदकाचा समावेश आहे. भारताचा दमदार भालाफेकपटू होकाटो सेमाने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले. नागालँडमध्ये राहणाऱ्या होकाटोची कहाणी खूपच वेदनादायक आहे. पण तरीही तो आयुष्यात पुढे जात राहिला आणि आता देशासाठी पदक जिंकून इतिहास घडवला आहे.
भारताचा दमदार भालाफेकपटू होकाटो सेमाने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब
होकाटो हे भारतीय लष्कराचे सैनिक राहिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाला होता. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब
होकाटो हा विशेष दलाचा भाग होता. त्यांची ड्युटी LOC वर होती. येथे त्यांनी भूसुरुंगाच्या स्फोटात पाय गमावला. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब
पाय गमावूनही होकाटोने हार मानली नाही आणि परिस्थितीशी लढत राहिला त्याने शॉट पुट खेळाची तयारी केली. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब
होकाटोने वयाच्या 40 व्या वर्षी पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या शॉट पुट F57 प्रकारातील अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब
इराणच्या यशिन खोसरावीने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 15.96 मीटर अंतरापर्यंत फेकले. तर ब्राझीलच्या थियागो पॉलिनोने रौप्यपदक जिंकले. त्याने 15.06 मीटर अंतरापर्यंत फेकले. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब
टीम इंडिया सध्या पदकतालिकेत 17 व्या स्थानावर आहे. भारताने एकूण 27 पदके जिंकली आहेत. त्यात 6 सोन्याचा समावेश आहे. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब