Belly Fat कमी करण्यासाठी नियमित करा 'या' भाज्यांच्या रसाचे सेवन
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी किंवा इतर वेळी भोपळ्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरावर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होईल. भोपळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.
पालकच्या रसात जीवनसत्त्वे अ, क, के, लोह, फोलेट्स, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे संध्याकाळच्या वेळी तुम्ही भूक लागल्यानंतर पालक स्मूदी बनवू शकता.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनसारखे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आढळून येतात. टोमाटोच्या रसाचे सेवन केल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा ठार कमी होतो.
कारल्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजनच नाहीतर मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी सुद्धा मदत होते. याशिवाय साचून राहिलेली विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी अतिशय प्रभावी ठरेल.
विटामिन सी युक्त आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. हा रस शरीरातील विषारी पदार्थ स्वच्छ करतो.