जेवणानंतर अनेकांना बडीशेप किंवा मसाला पान खाण्याची सवय असते. बडीशेप किंवा धनाडाल खाल्ल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण त्याऐवजी जेवणानंतर नियमित पुदिन्याच्या पानांचा चहा बनवून प्यावा. पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याची पाने अतिशय फायदेशीर ठरतात. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा चहा प्यावा. यामुळे पोटात थंडावा टिकून राहतो. (फोटो सौजन्य – istock)
जेवणानंतर नियमित प्या 'या' हिरव्या पानांचा चहा, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा चहा बनवून प्यावा. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होते आणि आरोग्य सुधारते.

आपल्यातील अनेकांना कायमच अपचनाचा त्रास होतो. पोटात वेदना, ऍसिडिटी, गॅस किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवू लागल्यानंतर कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी पुदिन्याची पाने चावून खावीत किंवा पाणी बनवून प्यावे.

पचनसंस्थेतील स्नायूंना आराम देण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा चहा प्यावा. पोट फुगणे आणि इरिटेबल बाऊल सिंड्रोम यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याची पाने फायदेशीर ठरतील.

जेवणानंतर पचनक्रिया जलद पचन होण्यासाठी १ तासानंतर पुदिन्याच्या पानांचा चहा प्यावा. हा चहा बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे. एक ग्लास पाणी टोपात गरम करून त्यात पुदिन्याची पाने घालून उकळवा.

पोटाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. पण आरोग्यासंबंधित इतर कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.






