मराठी सिनेसृष्टीत अगदी वयाच्या लहानपणापासून ते आतापर्यंत सगळ्यांची लाडकी असणारी अभिनेत्री रुमानी खरे आता लग्नाच्या दारात उतरणार आहे. खरेंच्या दाराशी मांडव उभारले आहे आणि काहीच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्या मांडवात रुमानी आणि तिचा होणारा नवरा स्तवन शिंदे, जोडीने सप्तपदी घेणार आहेत आणि आपली लाडकी चिंटू फेम रुमानी सात जन्मांसाठी स्तवनची होणार आहे.
रुमानी खरेच्या हातावर सजली स्तवन शिंदेच्या नावाची मेहंदी! (फोटो सौजन्य - Social Media)

दरम्यान, रुमानीने सोशल मीडियावर तिच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटोज शेअर केले आहेत. या गोड क्षणांमध्ये अभिनेत्री फारच मनमोहक दिसत आहे.

तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या आनंदला मोजणे अशक्य आहे, इतकी ती आनंदी दिसत आहे. मेहंदी कार्यक्रमात तिने फिकट जांभूळ रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

हातावर रंगलेली मेहंदी त्या दोघांच्या नात्याची आणि प्रेमाची खोली सांगत आहेत. तिच्यावर सजलेले आभूषण तिच्या सौंदर्याने नटलेले आहेत.

दोघांचा आनंद गगनात मावेना आणि दोघांच्या चाहत्यांनाही फार आनंद झाला असल्याचे कमेंट्सच्या माध्यमातून कळून येत आहे. अगदी शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.

रुमानीने ही पोस्ट शेअर केली असून त्याखाली "And it begins" म्हणजेच आणि "या सोहळयाला सुरुवात!" या अर्थी कॅप्शन दिले आहे.






