मधुमेहापासून आरोग्यासंबंधित अनेक समस्यांवर प्रभावी ठरेल सदाफुली
शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सदाफुलीची फुले चघळावी. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच रक्तवाहिन्यांना आराम मिळून रक्त परिसंचरण सुधारतो.
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी सदाफुलीच्या फुलांचा वापर करावा. सदाफुलीच्या फुलांचा आणि पानांचा लेप जखमा, फोड आणि एक्झिमा सारख्या त्वचेच्या समस्या दूर होतात.
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी सदाफुलीचा वापर केला जातो. यामध्ये असलेले अल्कलॉइड्स शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित करतात, ज्यामुळे शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहतो.
सदाफुलीच्या फुलांचा काढा प्यायल्यामुळे पोटाच्या गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय पाचक एंजाइम सक्रिय होऊन पचनक्रिया सुधारते.
सदाफुली वनपस्ती शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून बचाव करते. या फुलांच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. याशिवाय शरीर कायम निरोगी राहते.