दिवाळी सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे अनेक मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर सेल सुरु झाले आहेत. सेल सुरु होताच ग्राहकांची पहिली नजर स्मार्टफोन्सवर असते. कारण सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह महागडे स्मार्टफोन देखील स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळते. मात्र सेलमधून स्मार्टफोन खरेदी करताना सावध राहणं गरजेचं असतं, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्ही सेलमधून खरेदी केलेला स्मार्टफोन खरा आहे की बनावट हे ओळखण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा. (फोटो सौजन्य: Pinterest)
Tech Tips: सावधान! ऑनलाईन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स...

प्रत्येक नवीन मोबाईल फोनच्या बॉक्सवर आणि डिव्हाईसमध्ये IMEI नंबरचा स्टिकर लावलेला असतो. जर फोनच्या बॉक्सवर हा स्टिकर नसेल तर काही गडबड असू शकते.

संचार साथी पोर्टलवर जाऊन व्हेरिफाय करू शकता की IMEI नंबर खरा आहे की बनावट.

संचार साथी वेबसाईट ओपन करा आणि सिटीझन सेंटर सर्विसमध्ये जाऊन Know Your Mobile पर्याय निवडा.

आता मोबाईल नंबर, कॅप्चा आणि ओटीपी एंटर करून IMEI नंबर टाईप करा. आता तुमच्या फोनची सर्व माहिती दिसू लागेल.

सेलमधून डिस्काऊंट आणि ऑफर्सच्या नावाखाली स्मार्टफोन खरेदी करताना सावध असणं गरजेचं आहे, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.






