Jhumka Patola Song: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सूरज बडजात्या यांचा नवा सिनेमा येतोय ‘ये प्रेम मोल लिया’. फॅमिली एंटरटेनमेंट असणार हे तर नक्की. या सिनेमातलं ‘झुमका पटोला’ हे गाणं सध्या सगळीकडे वाजतंय. इंस्टाग्रामवर, रील्सवर सगळीकडे याच गाण्याची हवा आहे. Jhumka Patola Song:
पण या गाण्याला सगळ्यात जास्त अभिनेत्री सीमा पाहवा यांनी व्हायरल केलंय. त्यांनी या गाण्यावर असा काही डान्स केलाय की बघणारा थक्कच होईल. त्यांचा एकदम साधा, मस्त आणि मनमोकळा डान्स आहे. कोणताही भारी स्टेप नाही, पण त्यात जी मजा आहे तीच लोकांना आवडतेय. त्यांच्या डान्समुळे गाण्याची रंगतच वाढली आहे.सीमा पाहवा यांचा हा व्हिडिओ समोर येताच बॉलिवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्रींनी त्यावर कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केलाय.
या व्हिडिओवर सगळ्यात भारी कमेंट्स आल्या आहेत.
शर्वरीने लिहिलंय “ओय्येऽऽऽ होय्येऽऽ!”
ऋचा चड्ढा म्हणाली “शबीना, तू खूप गोड आहेस!”
भूमी पेडणेकरने लिहिलं “क्या बात है सीमा मॅम!”
अदिती राव हैदरीने तर लिहिलं “लव्ह!!!!!!!”
निमृत म्हणाली “दिवा!”
स्वानंद किरकिरे म्हणाला “वाह वाह!! मलाही नाचायचं आहे!”
आणि जेमी लीव्हरने लिहिलं “वॉव!”म्हणजे बघा, एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या डान्सने सगळ्या यंग अभिनेत्रींना पण वेड लावलंय.

‘झुमका पटोला’ हे गाणं आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्यावर शूट केलंय. गाणं ऐकलं की आपोआप पाय थिरकायला लागतात. इतकं उत्साही आणि जल्लोषाचं गाणं आहे.या गाण्याला संगीत दिलंय हिमेश रेशमियाने आवाज आहे श्रेया घोषालने गायले आहेत. डान्स बसवलाय शबीना खानने आणि कॅमेरा हाताळलाय मनोज कुमार खट्टोई.
Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक
राजश्री फिल्म्सची एक वेगळीच स्टाईल असते. त्यांच्या सिनेमात जी परंपरा, जो उत्सव दाखवला जातो तो कधीच जुना होत नाही. सीमा पाहवा यांनी त्याच राजश्री स्टाईलमध्ये या गाण्यावर डान्स करून सिनेमाच्या उत्सवात अजूनच रंग भरले आहेत.
हा सिनेमा राजश्री प्रॉडक्शन्स आणि महावीर जैन फिल्म्स मिळून बनवत आहेत. दिग्दर्शन अर्थातच सूरज बडजात्या यांचं आहे. आयुष्मान खुराना आणि शर्वरी मुख्य भूमिकेत आहेत.
‘ये प्रेम मोल लिया’ हा सिनेमा 27 नोव्हेंबर 2026 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. त्याआधीच त्याची गाणी, त्याचे डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.सीमा पाहवा यांच्या या एका डान्सने हे गाणं अजूनच हिट झालंय. तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या, तुम्हाला पण नाचायचा मोह आवरणार नाही.






