सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे २ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. फॅशन डिझायनरचे निधन झाल्यानंतर अभिनेत्री सोनम कपूरने खास त्यांच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी डिझाईन केलेला ड्रेस वेअर करत फोटोशूट केला आहे.
Sonam Kapoor Special Outfit
सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलने बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरसाठी खास दिवाळी स्पेशल लूक केला होता. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधले.
सोनम कपूरने खास दिवाळी निमित्त पती आनंद आहुजासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले. तिने केलेल्या फॅशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून तिच्या फॅशनचे कौतुक केले जात आहे.
व्हाईट फुल्ल गाऊन, गोल्डन फुल्ल कोट, नॉर्मल ज्वेलरी आणि सुंदर फोटो पोजेसने तिच्या फोटोंची चर्चा होत आहे. अभिनेत्रीचा हा रॉयल लूक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गळ्यात पिंक गुलाबाची डिझाईन असलेली युनिक एक्सेसरीज कॅरी करून हटके आऊटफिट केला आहे. अभिनेत्रीचा हा हटके आऊटफिट दिवंगत सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलने डिझाईन केला आहे.
तिच्या ड्रेसवर असणाऱ्या बारीक डिझाईन्सने सर्वांचेच लक्ष वेधले असून रोहित बलच्या कामाचे कौतुक चाहते करीत आहेत.
सोनम कपूर लग्नानंतर फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरीही ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. तिच्या फॅशनची नेहमीच चर्चा होत असते.