एमपीएससीच्या अध्यक्षपदी विवेक भिमनवर
एमपीएससीच्या अध्यक्षपदी विवेक भिमनवर
नियुक्तीचा आदेश आजपासून लागू
यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कामकाज
पुणे: महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज महत्त्वाची अधिसूचना जारी केली असून, भारतीय संविधानाच्या कलम ३१६ (९) नुसार राज्यपालांच्या अधिकाराने विवेक लक्ष्मीकांत भिमनवर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते राज्य प्रशासनिक सेवेतील अधिकारी असून, त्यांच्या नियुक्तीचा आदेश (Career) आजपासून लागू झाला आहे.
भिमनवर हे विद्यमान अध्यक्ष ६२ वर्षे पूर्ण होणे किंवा त्यांचा कार्यकाळ संपणे यापैकी जे आधी होईल तोपर्यंत पदावर कार्यरत राहणार आहेत. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त म्हणूनही कामकाज पाहिले आहे.
अध्यक्षपदी भिमनवर यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार आयोगाचे सदस्य डॉ. अभय एकनाथ वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
एमपीएससी अध्यक्षपद ही एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. राज्यातील विविध सरकारी सेवांसाठी भरती परीक्षा, त्यांचे धोरणात्मक नियोजन, पारदर्शकता आणि संचालनाची जबाबदारी आयोगाकडे असते. त्यामुळे नव्या अध्यक्षाकडून कार्यक्षमता, पारदर्शकता आणि भरती प्रक्रियेत सुधारणा या अपेक्षा वाढणार आहेत.
MPSC अभियांत्रिकी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांसाठी खुशखबर! मुलाखत तयारीसाठी बार्टीतर्फे आर्थिक सहाय्य
MPSC अभियांत्रिकी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांसाठी खुशखबर
राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची दिलासादायक घोषणा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यातर्फे एमपीएससी अभियांत्रिकी सेवांच्या मुलाखत तयारीसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२४ मध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना या योजनेंतर्गत एकरकमी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अधिकाधिक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे. मुलाखत प्रक्रियेदरम्यान होणारा आर्थिक खर्च, मार्गदर्शन वर्ग, प्रवास तसेच तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ०५४/२०२५ क्रमांकाच्या अधिसूचनेनुसार १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या एमपीएससी अभियांत्रिकी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेले असणे अनिवार्य आहे.






