आपण सगळेजण सुपरमून जाणून असाल, या क्षणी दिसणारा चंद्र इतर दिवसांहून काही औरच असतो. त्याचे रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी सर्व उत्सुक असतात. फक्त डोळ्यातच नव्हे तर त्या क्षणांना आपल्या कॅमेराच्या किंवा मोबाईलच्या मेमरीमध्ये जपून ठेवण्यासाठी सर्व प्रयत्नशील असतात. महत्वाचे म्हणजे कालचा सुपरमून जगभरात पाहिला गेला आहे. जगभरातील हौशी छायाचित्रकारांनी या क्षणांना आपल्या कॅमेरात टिपले आहे.
१७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुपरमून दिसुन आला. (फोटो सौजन्य - Social Media)
१७ ऑक्टोबर २०२४ रोजी, यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा सुपरमून दिसून आला. या सुपरमूनची सर्वत्र जगभरात चर्चा होती.
या रात्री दिसून आलेला चंद्र आकाराने फार विशाल होता. सामान्य चंद्राच्या आकारापेक्षा १४% जास्त मोठा आकार या चंद्राचा होता.
कालच्या सुपरमूनविषयी सांगायचे झाले तर हा सुपरमून इतर दिवसांपेक्षा जास्त चमकदार होता. इतर रात्रींच्या तुलनेत कालची रात्र ३०% जास्त चमकदार होती.
सुपरमून तेव्हा दिसून येतो, जेव्हा चंद्र आणि पृथ्वी या मधील अंतर कमी असते. यावेळी चंद्र अधिक मोठा आकारात आणि चमकदार दिसून येतो.
१७ ऑक्टोबर रोजी दिसून आलेला सुपरमून यंदाच्या वर्षातील तिसरा सुपरमून आहे. बहुतेक लोकांनी निसर्गाच्या या स्थितीचा आनंद आपल्या डोळ्यामध्ये कैद केला.