उन्हाळ्यात आवडीने खाल्ले जाणारे थंडगार आईस्क्रीम आरोग्यासाठी ठरेल घातक
उन्हाळ्यासह इतर दिवसांमध्ये जास्त प्रमाणात आईस्क्रीमची सेवन केल्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. कारण यामध्ये कॅलरीज आणि फॅट जास्त आढळून येतात.
मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात आईस्क्रीमचे सेवन करू नये. कारण यामध्ये जास्त प्रमाणात साखर असते. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते.
आईस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हार्ट अटॅक किंवा स्टोक सारखी गंभीर समस्या उद्भवू शकते.
काहींना आईस्क्रीम खाल्यानंतर जुलाब, उलट्या किंवा अपचनाची समस्या उद्भवते. कारण यामध्ये असलेले लैक्टोज काहींना सहज पचत नाहीत.
दातांसंबंधित समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना आईस्क्रीम खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र यामुळे दातांमधील वेदना काहीवेळा वाढण्याची शक्यता असते.