पितृपक्षातील श्राद्धच्या जेवणात आवर्जून बनवले जातात 'हे' पदार्थ
पितृपक्षात बनवला जाणारा प्रमुख पदार्थ म्हणजे वडे. कोणत्याही डाळी किंवा तांदूळ न भाजता वडे बनवले जातात. या वड्यांची चव अतिशय सुंदर लागते. तांदूळ, हरभरा, डाळींचे मिश्रण तयार करून पीठ बनवले जाते.
वेगवेगळ्या भाज्या आणि मसाले टाकून मिक्स भाजी बनवली जाते. यामध्ये भोपळा, गवार या भाज्यांचा समावेश आहे. गवार आणि भोपळा वाफेवर शिजवला जातो.
अळू, शेंगदाणे, वाल, मक्याचे कणीस वापरून अळूची पातळ भाजी बनवली जाते. अळूची भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पारंपरिक चवीची पौष्टिक भाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.
पितृपक्षात केळीच्या पानांवर जेवण वाढले जाते. त्यात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आमसूल चटणी. आंबट गोड चवीच्या चटणीशिवाय ताट भरल्यासारखे वाटत नाही.
नैवेद्याच्या पानावर ठेवण्यासाठी गोड पदार्थ बनवले जातात. त्यात प्रामुख्याने तांदळाची खीर बनवली जाते. तांदळाची खीर चवीला अतिशय सुंदर लागते.