गव्हाच्या चपातीहून 100 पट फायदेशीर आहे ही चपाती! अनेक सेलेब्रिटीही करतात आहारात समावेश
सर्व घरांंमध्ये भाजीसोबत काय खायचं म्हटलं की घरी गव्हाच्या पिठाची चपाती तयार केली जाते. पण या गव्हाच्या चपातीऐवजी तुम्ही इतरही अनेक प्रकारच्या चपात्यांचा आपल्या आहारात समावेश करु शकता
एका मुलाखतीत, बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने स्पष्ट केले की, ती आपल्या आहारात कधीही गव्हाच्या चपातीचा समावेश करत नाही
राजगिरा, बाजरी, ज्वारी, नाचनी आणि क्विनोआपासून पाैष्टिक अशी चपाती तयार केली जाते. ही चपाती आरोग्याला अनेक फायदे मिळवून देते
खास करुन तेव्हा जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचे असते. अशावेळी आपल्या आहारात तुम्ही ही हेल्दी चपाती समावेश करु शकता
राजगिरा, बाजरी, ज्वारी, नाचनी क्विनोआ एकत्र करुन पीठ दळून आणा आणि त्याची चपाती तयार करा. रोजच्या आहारात या चपातीचा समावेश केल्यास निश्चितच तुम्हाला शरीरात मोठे फरक झाल्याचे दिसून येईल