किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यानंतर विषारी घटक शरीरामध्ये तसेच साचून राहतात. यामुळे आरोग्य हानी पोहचते. किडनी रक्त शुद्ध करून शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे किडनीच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात किडनीला आवश्यक असलेल्या सर्वच पौष्टिक घटकांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनीचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
कांद्यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते, जे किडनीसाठी प्रभावी आहे. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचे रक्षण होते.
किडनीसाठी सगळ्यात आवश्यक असलेला घटक म्हणजे पाणी. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते.
रोजच्या आहारात स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी इत्यादी बेरीजचे सेवन करावे. या पदार्थाच्या सेवनामुळे शरीराचे कार्य सुधारते आणि किडनीला अनेक फायदे होतात. किडनीमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी बेरीज खावीत.
सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स घटक आढळून येतात, जे शरीरासाठी अतिशय प्रभावी आहेत. याशिवाय शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सफरचंद खाणे फायद्याचे आहे.
लसणामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे किडनीमध्ये होणारी जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून बचाव होतो. लसूण सोडियमचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते.