लटकणारे पोट कमी करण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे आहारात सेवन
जिरे आणि धणे या मसाल्यांच्या पाण्याचे एकत्रित सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत राहील आणि शरीराला अनेक फायदे होतील. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम हे मसाल्याचे पाणी प्रभावी ठरते.
कलिंगडमध्ये कमी कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी आहारात कमी कॅलरीज युक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे नाश्त्यात तुम्ही कलिंगड आणि पुदिन्याच्या पानांची स्मूदी बनवून पिऊ शकता.
पुदिन्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होईल आणि शरीर कायम थंड राहील. उन्हाळा वाढल्यानंतर पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे.
काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. यामुळे उन्हाळ्यात नियमित काकडी खाल्यास शरीर हायड्रेट राहते. पचन क्रिया सुधारण्यासाठी काकडी पुदिन्याच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होईल.
विटामिन सी युक्त लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन करावे.