हिवाळा ऋूतू सुरु झाला असून या ऋतूतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे थंडीपासून स्वतःचे संरक्षण करणे. कडकडीत थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी लोक जाड कपडे, सॉक्स, हँडग्लोव्ह्स अशा कपड्यांचा वापर करतात. पण कपडा जाड असून उपयोग नाही तर त्याचे गरम असणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. चुकीचे कापड थंडीसोबतच त्वचेलाही हानी पोहचवते, अशात योग्य कापडाची निवड करणे फार गर्जनेचे ठरते. योग्य कापड शरीराला ऊब मिळवून देते.
Best Fabric For Winter : या 5 फॅब्रिकचे कपडे हिवाळ्यात शरीराला उबदारपणा देतील

वूलन - हिवाळ्यात जास्तीत जास्त उष्णता देण्यासाठी वूलन हे सर्वात जुने आणि विश्वासार्ह कापड आहे. हे केवळ थंडीपासून आपले संरक्षण करत नाही तर वारा आणि ओलावा देखील रोखते.

वेलवेट - वेलवेट कापड बाहेरील उष्णता शरीराला जाणवून देत नाही. यामुळे शरीराचे बाहेरील थंडीपासून संरक्षण होते. या कापडापासून बनवलेले कपडे फार लोकप्रिय आहेत.

फ्लीस - हे हलके आणि मऊ कापड आहे जे शारीराला उबदारपणा देते. फार वजनदार नसल्याने याचा रोजच्या जीवनात वापर केला जाऊ शकतो. हे कापड सुकायलाही फार वेळ घेत नाही आणि लवकर सुकते.

काश्मिरी - कश्मीरी कापड हे खूपच मऊ आणि उबदार असते. थंडीत या कापडाचा वापर आपल्याला एक शाही आणि आरामदायी अनुभव देतो. काश्मिरी कापडाची खासियत म्हणजे हलक्यापणातही दिर्घकाळ शरीरात उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता.

फ्लॅनेल - हे एक मऊ, हलके आणि ऊबदार कापड आहे. हे कापड थंडीत शरीराला उत्तम ऊबदारपणा मिळवून देते. फ्लॅनेल शर्ट घरी आणि ऑफिसमध्ये दोन्ही ठिकाणी घालता येतात.






