महाराष्ट्रातील विवाहित स्त्रियांच्या सौभाग्याचा आणि परंपरेचा सगळ्यात महत्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र. यात काळ्या मण्यांची सोन्याची साखळी आणिव त्यात वाटी किंवा पेंडेंट लावले जाते. मंगळसूत्र हा दागिना पती-पत्नीच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानला जातो. भारतीय संस्कृतीत वैवाहिक वचनबद्धतेची आणि अखंड सौभाग्याची ओळख कायम टिकून राहावी म्हणून लग्न करताना गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. काळे मणी वाईट नजरेपासून रक्षण करतात, अशी मान्यता आहे. बदलत्या फॅशननुसार बाजारात मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन उपलब्ध झाले आहेत.त्यामुळे रोजच्या वापरात तुम्ही या मंगळसूत्र डिझाईनची निवड करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन

रोजच्या वापरात सगळ्यांचं नाजूक आणि स्टायलिश मंगळसूत्र हवे असते. त्यामुळे सिंगल डायमंड आणि काळ्या मण्यांचा वापर करून बनवलेले मंगळसूत्र नियमित गळ्यात घालू शकता.

सोन्याची छोटी चेन आणि काळे मणी एकत्र करून बनवलेले मंगळसूत्र कोणत्याही ड्रेस, साडीवर किंवा पार्टी वेअर ड्रेसवर उठावर दिसते. सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे नाजूक मंगळसूत्राच्या डिझाईनला मोठी मागणी आहे.

मंगळसूत्राचे प्रमुख आकर्षण म्हणजे मध्यभागी असलेले ठसठशीत पेंडंट. काहींना मंगळसूत्रात नाजूक वाट्या आवडतात तर काहींना मोठ्या आकाराचे पेंडंट खूप जास्त आवडते.

दागिन्यांच्या दुकानात गेल्यानंतर वेगवेगळ्या डिझाइन्स पाहून गोंधळ निर्माण होतो, पण रोजच्या वापरासाठी कायमच नाजूक आणि गळ्यात शोभून दिसणाऱ्या दागिन्यांची निवड करावी.

लग्नकार्य, सण-समारंभ किंवा इतर कार्यक्रमात जाताना तुम्ही या डिझाईनचे मंगळसूत्र घालू शकते. यामुळे गळा भरगच्च दिसेल आणि इतर कोणतेही दागिने घालण्याची आवश्यकता भासणार नाही.






