जेवण बनवताना करा 'या' तेलांचा वापर
कॅनोला तेलामध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात आढळून येते. हृदयाच्या आरोग्यासाठी कॅनोला तेल अतिशय प्रभावी आहे.
तूपामध्ये ए, डी, ई, आणि के विटामिन मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तुपाचा वापर रोजच्या आहारात केल्यामुळे जेवलेले अन्न पचन होण्यास मदत होते. तसेच शरीराला आलेली सूज कमी होऊन आरोग्य सुधारते.
इतर तेलांच्या तुलनेत नारळाच्या तेलाचा वापर जेवणासह केस आणि त्वचेच्या निरोगी आरोग्यसाठी सुद्धा केला जातो. नारळाच्या तेलाचा वापर जेवणात केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. तसेच तुम्ही जेवण बनवताना किंवा सॅलेडमध्ये या तेलाचा वापर करू शकता.
अव्होकाडो तेल मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असून अनेक लोक जेवण बनवताना या तेलाचा वापर करतात. तळण्यासाठी आणि ग्रिल करण्यासाठी अव्होकाडो तेल उत्तम पर्याय आहे.