प्रथमच लॅपटॉप खरेदी करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य लॅपटॉप निवडू शकता. प्रथमच लॅपटॉप खरेदी करताना, योग्य लॅपटॉप निवडणे खूप कठीण आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच लॅपटॉप खरेदी करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. पहिल्यांदा लॅपटॉप खरेदी करताना योग्य लॅपटॉप निवडणे हे अवघड काम आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच लॅपटॉप खरेदी करत असाल तर ते आणखी महत्वाचे होते.
पहिल्यांदाच नवीन लॅपटॉप खरेदी करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नंतर पश्चाताप नको (फोटो सौजन्य - pinterest)
लॅपटॉप खरेदी करण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या विशिष्ट गरजा आणि उद्देश ओळखणे. तुम्ही गेमर आहात, तर हाय- परफॉर्मंस असलेला लॅपटॉप तुमच्यासाठी बेस्ट असेल.
तुमच्या गरजा जाणून घेतल्याने तुम्हाला पर्याय कमी करण्यात आणि तुमच्या गरजा पूर्ण करणारा लॅपटॉप शोधण्यात मदत होईल. म्हणजे लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी तुम्ही लॅपटॉप कोणत्या उद्देशासाठी वापरणार हे ठरवावे लागेल. आणि त्या आधारावर लॅपटॉपचे बजेट ठरवावे.
लॅपटॉपच्या स्क्रीनचा आकार देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक वेळा आपण घाईघाईने आवश्यकतेपेक्षा मोठा किंवा लहान स्क्रीन आकाराचा लॅपटॉप विकत घेतो आणि नंतर त्याच्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते.
जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि लॅपटॉप बराच काळ सोबत ठेवावा, तर तुम्ही लहान स्क्रीन आकाराचा कॉम्पॅक्ट लॅपटॉप घ्यावा जेणेकरून कॉलेजमध्ये नेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. जर तुम्ही ग्राफिक्स किंवा एडिटिंगसाठी लॅपटॉप विकत घेत असाल किंवा तुम्ही प्रोग्रामिंग करत असाल तर तुम्ही मोठ्या स्क्रीन आकाराचा लॅपटॉप खरेदी केला पाहिजे.
तुम्ही सतत लॅपटॉपचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे लॅपटॉपची बॅटरी. दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह चांगला परफॉर्मन्स देणारा लॅपटॉप शोधा. जेणेकरुन सतत पॉवर आउटलेटला सामोरे जावं लागणार नाही.
कमी किमतीत चांगला लॅपटॉप ओळखण्यासाठी तुम्हाला लॅपटॉपचा प्रोसेसर (सीपीयू), रॅम, ग्राफिक्स कार्ड (जीपीयू), स्टोरेज (हार्ड ड्राइव्ह किंवा एसएसडी), ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) आणि बॅटरीचे आयुष्य याकडे लक्ष द्यावे लागेल.