माणसाने जाती घडवल्या, धर्म घडवल्या. आता भूत ही कधी ना कधी माणसंच होती, त्यामुळे आपल्या पद्धतींचा त्यांच्या दुनियेत फार मोठा प्रभाव आहे. अगदी, भुतांमध्ये ही जातीभेद आढळतो. भुतांना विशिष्ट जाती असतात तर कधी कधी धर्मही असतात. मग तुम्हाला तुमच्या समाजातील भुताबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच लागली असेल. चला तर मग जाणून घेऊयात.
तुमच्या समाजाचं भूत कोणतं? (फोटो सौजन्य - Social Media)
कोकणात रात्रीची सफर केली तर आपोआप त्या दुनियेची सफरही घडते. अनेकांना तसा अनुभवही आलाच असेल. कोकणातील प्रसिद्ध भूत म्हणजे देवचार! असे म्हंटले जाते की हे भूत शूद्रांचे असते.
छेडा या भुतालाही शूद्र भुतांमध्ये मोजतात. शूद्र वर्णात जन्म घेऊन मृत्यूमुखी पडलेली लोकं या प्रेतांमध्ये गणले जातात. झोटिंग नावाचा भूत कोळी तसेच इतर मच्छीमार जातींमध्ये आढळतो.
क्षत्रियाचे भूत एका क्षत्रिया प्रमाणेच असते. क्षत्रियांच्या भुताला वीर संबोधले जाते. हे भूत मराठी भाषिक क्षत्रियाचे असेलच असे नाही इतर अमराठी जणांचेही वीर प्रेतांमध्ये समावेश होतो.
मुंज्या तसेच ब्रह्मराक्षस हे दोन्ही भूत ब्राह्मणाचे असतात. पिंपळ तसेच उंबराच्या झाडावर त्यांचे वास्तव्य असते. कोकणातील मुंज्या अतिशय प्रसिद्ध आणि भयंकर प्रकार आहे.
जीन तसेच पिशाच हे मुस्लिम धर्मीयांमध्ये आढळणारे प्रेत आहेत.