Maharashtra Breaking News
03 Oct 2025 10:20 AM (IST)
भारतीय १९ वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलियामध्ये एक महत्त्वपूर्ण विक्रम रचला आहे. ऑस्ट्रेलियातील कोणत्याही १९ वर्षांखालील संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी, हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. ऑस्ट्रेलियाने १९८९ मध्ये न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. यासह, भारतीय संघाने ३६ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आणि एक महत्त्वपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे.
03 Oct 2025 10:12 AM (IST)
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांनी गुरुवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्यासोबत रेडियन्स दांडिया येथे दसरा साजरा केला. प्रार्थना करण्यापासून ते “दांडियाची राणी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्गुनी पाठक यांच्यासोबत गरब्याच्या आनंदात सामील होण्यापर्यंत, नीता यांनी लक्ष वेधून घेतले. “मी लहान असताना, मी नवरात्रीच्या नऊही दिवस रात्री नाचायचे. हे माझ्या तारुण्याच्या अनेक सुंदर आठवणींना उजाळा देते. मी फाल्गुनी (पाठक) यांना २५ वर्षांपासून ओळखते,” असे नीता अंबानी यांनी सांगितले.
03 Oct 2025 10:04 AM (IST)
टीव्हीवरील लोकप्रिय वादग्रस्त रिअॅलिटी शो “बिग बॉस १९” सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियापासून ते बातम्यांपर्यंत, या शोची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. दरम्यान, अलीकडेच बाहेर काढलेला स्पर्धक आवेज दरबार देखील चर्चेत आहे. आवेजबद्दल बरीच चर्चा आहे. असेही म्हटले जात आहे की आवेजच्या कुटुंबाने त्याला शोमधून काढून टाकण्यासाठी निर्मात्यांना २ कोटी रुपये दिले होते. याबद्दल अवेजचे स्वतः काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया. बातमी सविस्तर वाचा...
03 Oct 2025 09:55 AM (IST)
Pakistan vs Bangladesh, Women’s World Cup 2025 : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धा ३० सप्टेंबर रोजी सुरू झाली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी, कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघ आमनेसामने आले होते. हा रोमांचक सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. पाकिस्तानची फलंदाजी बांगलादेशची गोलंदाजीसमोर अपयशी ठरली.
03 Oct 2025 09:50 AM (IST)
भारताचा कसोटी संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेला कालपासून सुरुवात झाली आहे, भारताच्या संघाने पहिल्या दोन सेशनमध्येच वेस्ट इंडिजच्या संघाला पहिल्या इंनिगमध्ये सर्वबाद केले. शुक्रवारी ग्रीन पार्क येथे होणाऱ्या भारत अ-अ मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्टार भारतीय खेळाडू अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अर्शदीप आणि हर्षित राणा मालिका जिंकण्याचे ध्येय ठेवतील. कर्णधार श्रेयस आणि प्रियांश यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतके झळकावली, ज्यामुळे भारत अ संघाला १७१ धावांनी मोठा विजय मिळाला.
03 Oct 2025 09:45 AM (IST)
Zimbabwe qualified for the 2026 T20 World Cup : झिम्बाब्वे संघाने मोठी कामगिरी केली आहे. झिम्बाब्वे संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. झिम्बाब्वेने केनियाचा ७ विकेट्सने पराभव करून टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे. झिम्बाब्वेपूर्वी नामिबिया संघाकडून २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश आले होते.
03 Oct 2025 09:39 AM (IST)
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने कापशेरा परिसरात झालेल्या चकमकीत दोन प्रमुख गुन्हेगारांना यशस्वीरित्या अटक केली आहे. अटक केलेल्या गुन्हेगारांमध्ये आकाश राजपूत (श्रीगंगानगर, राजस्थान) आणि महिपाल (भरतपूर, राजस्थान) यांचा समावेश आहे. ही कारवाई परदेशात असलेल्या भारतीय गुंडांचे नेटवर्क उध्वस्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. चकमकीदरम्यान आकाश राजपूतच्या पायाला गोळी लागली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
03 Oct 2025 09:35 AM (IST)
जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज ३ ऑक्टोबर रोजी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची मंद सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९४८ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १९ अंकांनी कमी होता.
03 Oct 2025 09:30 AM (IST)
ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कांतारा चॅप्टर १’ आणि वरुण धवनचा ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे दिसून आले आहे. शशांक खेतान दिग्दर्शित या कौटुंबिक मनोरंजन चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर ऋषभ शेट्टीच्या पौराणिक चित्रपटाची लोकांमध्ये वेगळीच क्रेझ दिसून येत आहे. हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या शैलीचे आहेत, परंतु ‘कांतारा चॅप्टर १’ पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. दुसरीकडे, ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ची सुरुवात पहिल्या दिवशी संथ झाली. आणि आता हा चित्रपट देखील चांगली कमाई करताना दिसत आहे.
03 Oct 2025 09:20 AM (IST)
भारतात आज 3 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,868 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,879 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,901 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,18,680 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 89,010 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 153.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,53,100 रुपये आहे.
03 Oct 2025 09:10 AM (IST)
IND VS PAK : आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वाद झाल्याचे बघायाल मिळाले. खेळाडूंनी हस्तांदोलन न करण्यापासून ते ट्रॉफी सादर करण्यापर्यंत, वादांनी मथळे बनवले होते. अंतिम सामना जिंकल्यानंतर, भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नमकार दर्शवला होता आणि भारतीय संघ ट्रॉफीविनाच मायदेशी परतला होता. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्येही असेच वाद होताना दिसत आहेत.
03 Oct 2025 09:08 AM (IST)
नाशिक शहरात खुनाच्या घटनांची मालिका सुरूच असून मध्यरात्री पुन्हा एका युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक रोड परिसरातील गोरेवाडी भागात तीन ते चार जणांनी कृष्णा ठाकरे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत शहरात खुनांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
03 Oct 2025 09:06 AM (IST)
“गर्वाने बोला मी महाराष्ट्रीयन आहे” असा मराठी अभिमान जागवणाऱ्या ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. तब्बल १६ वर्षांनंतर या लोकप्रिय चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, महेश मांजरेकर लिखित व दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
टिझरमध्ये “हमारी सोसायटी में हम घाटी लोगों को नहीं रखते” या वाक्याने सुरुवात होत असून, व्यापाऱ्यांच्या आड दडलेल्या परप्रांतीयांच्या दबंगईला मराठा युवकाकडून मिळणारा आक्रमक प्रतिसाद यात दाखवण्यात आला आहे. पहिल्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा नेतृत्वदृष्टिकोन पिचलेल्या मराठी माणसाला जागवणारा दाखवण्यात आला होता. तर या सिक्वलमध्ये महाराजांचे आक्रमक रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
03 Oct 2025 09:04 AM (IST)
नेहमीच आपल्या विचित्र आणि गाजलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिचा नुकताच समोर आलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात केलेले विधान चांगलेच गाजत आहे.
आईच्या निधनानंतर काही काळ दुबईत वास्तव्यास असलेली राखी सावंत नुकतीच मुंबईत परतली. ती ‘पती पत्नी और पंगा’ या शोच्या शूटिंगदरम्यान पापाराझींना भेटली. यावेळी संवाद साधताना राखीनं एक आश्चर्यकारक दावा केला.
“माझ्या आईनं जग सोडण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात लिहिलं होतं की, डोनाल्ड ट्रम्प हे माझे खरे वडील आहेत,” असे वक्तव्य राखीनं पत्रकारांपुढे केले. या विधानामुळे राखी सावंत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली असून चाहत्यांमध्ये यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
03 Oct 2025 08:59 AM (IST)
KL Rahul’s great performance in Test cricket : अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळली जात आहे. या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या डावाची सुरवात केली. या सामन्यात भारताने पहिल्या डावात दिवसाअखेर २ बाद १२१ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचा भरवशाचा सलामीवीर केएल राहुलने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून आपला प्रभावी फॉर्म दाखवून दिला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी राहुलने ११४ चेंडूत नाबाद ५३ धावा फटकवल्या. या खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमधील एक विशेष कामगिरी केली आहे. हा त्याच्या कारकिर्दीतील २६ वा ५० प्लस धावांचा स्कोअर ठरला आहे.
03 Oct 2025 08:50 AM (IST)
शहरातील गिरगाव परिसरात एका तरुणाची फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनोळखी महिलेच्या आमिषाला बळी पडलेल्या तरुणाकडून तब्बल ३५ हजार रुपये उकळण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेनं गोड बोलून त्या तरुणाला लॉजवर बोलावले. तेथे पोहोचताच तिने तीन अन्य महिलांसोबत मिळून त्याला जाळ्यात ओढले. त्यानंतर बदनामीची भीती दाखवत चौघींनी त्याला धमकावून ३५ हजार रुपये जबरदस्तीने वसूल केले. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Marathi Breaking news live updates : अमरावती जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातून मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत तब्बल ११ जणांना शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ ऑक्टोबरच्या रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यातील पहिली धडक छापा टाकण्याची कारवाई ब्राह्मण सभा कॉलनी परिसरात झाली. येथील एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यातील पाच संशयित इसमांना शस्त्रांसह पकडण्यात आले.