वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण करणे टाळले जाते. पण चुकीच्या पद्धतीने डाएट फॉलो केल्यास वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीरास आवश्यक पदार्थांचे सेवन करावे. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी बऱ्याचदा सप्लिमेंट्स, तासनतास जिम, गोळ्या औषधांचे सेवन सुद्धा केले जाते. यामुळे फारसा बदल शरीरात दिसून येत नाही. त्यामुळे रात्रीच्या जेवणात या पदार्थांचा समावेश केल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
वजन होईल झपाट्याने कमी? रात्रीच्या जेवणात करा 'या' पदार्थांचा समावेश, फिट राहण्यासाठी हेल्दी पदार्थ

रात्रीच्या जेवणात पातळ तांदूळ, मूग डाळीची खिचडी खावी. मुगाची डाळ सहज पचन होण्यास मदत होते. ओट्स खिचडी, लापशी किंवा मुगाच्या डाळीची खिचडी खावी.

जेवणाची सुरुवात गरमागरम सूप ने करावी. ब्रोकोली सूप, मिक्स भाज्यांचे सूप, चिकन सूप इत्यादी वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले सूप प्यावे. सूप पचनाला अतिशय हलके असते.

रात्रीच्या जेवणात जास्त तेलजत किंवा तिखट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते. त्यामुळे हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

मैदा यांसारखे हेवी कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांचा आहारात अजिबात समावेश करू नये. त्यामुळे आहारात ब्राउन राईस, क्विनोआ यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.

रात्रीच्या जेवणात दाणेदार राजगिऱ्याच्या खिचडीचे सेवन करावे. राजगिरा किंवा भगर तांदळाचा वापर करून तुपात बनवलेली खिचडी खावी.






