धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येक व्यक्ती तणावपूर्ण जीवन जगत आहे. शरीरसोबतच मनावर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध तर काहीवेळा वेगवेगळ्या थेरपीसुद्धा घेतल्या जातात. पण तणाव कमी करण्यासाठी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी मनापासून हसणे फार आवश्यक आहे. हसल्यामुळे मनासोबतच शरीरावर वाढलेला तणाव सुद्धा कमी होण्यास मदत होते. ज्यावेळी आपण हसतो तेव्हा मेंदू सेरोटोनिन नावाचा हार्मोन स्रवतो, ज्यामुळे तणाव, चिंता आणि दुःख कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया हसण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
औषधांशिवाय मानसिक ताण कमी करायचा आहे? मग रोज हसल्याने शरीराला होतील 'हे' अद्भुत फायदे

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हसणे फार महत्वाचे आहे. हसल्यामुळे हार्मोनचा स्राव वाढतो आणि तणाव कमी होण्यास मदत होते. ज्यावेळी आपण एखाद्या आंनदी व्यक्तीसोबत राहतो तेव्हा क्रियाशीलता वाढते आणि मज्जासंस्थेवर सकारात्मक परिणाम होतात.

ऑफिसमधील तणावपूर्ण वातावरणामुळे काहीवेळा मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कामाचा थकवा बाजूला ठेवून कायमच आनंदी राहणे फार आवश्यक आहे.

विनोदबुद्धी हे बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. त्यामुळे कोणत्याही शुल्क गोष्टींवर तणाव निर्माण करण्याऐवजी शांत आणि हसतमुखाने राहिल्यास कायमच सकारात्मकता वाढेल.

एखाद्या व्यक्तीला हसवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा सुंदर हास्य खुलेल. पण हा प्रयत्न मर्यादित प्रमाणात करावा, अन्यथा समोरची व्यक्ती दुखावू शकते.

सकारात्मक वातवरणात कायमच राहिल्यास मानसिक तणाव निर्मण होत नाही आणि शारीरिक आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते.






