सर्वच महिला सौंदर्यात भर पाडण्यासाठी कायमच नटून थटून तयार होतात. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. बाजारात अनेक वेगवेगळ्या रंगाच्या लिपस्टिक उपलब्ध आहेत. लिपस्टिक सौंदर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतिक मानले जाते. तसेच जगभरात लाल लिपस्टिक वापरणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. पण जगातील या देशात महिलांना लाल लिपस्टिक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांसाठी ही लिपस्टिक संकट निर्माण करते. (फोटो सौजन्य – istock)
ओठांवर लावलेली लाल भडक लिपस्टिक सौंदर्या पूर्णपणे करून टाकेल खराब, 'या' देशात लाल लिपस्टिक लावण्यास आहे मनाई

उत्तर कोरियात किम जोंग उन हा देशाचा हुकूमशहा आहे. पण याचा देशातील लाल रंगाच्या लिपस्टिकला पाश्चिमात्त्य संस्कृत आणि भांडवलशाहीचे प्रतीक मानले जाते. पण देशात लाल लिपस्टिक लावणाऱ्या महिलेवर कडक कारवाई केली जाते.

लाल लिपस्टिक लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. देशात एखादी जरी महिला लाल लिपस्टिक लावून दिसली तर तिच्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे तिथे फक्त हलक्या आणि स्वतःच्या देशातब बनवलेल्या लिपस्टिक लावण्यास परवानगी आहे.

उत्तर कोरियात लाल रंगाच्या लिपस्टिकला ग्लॅमर, वैयक्तिक आकर्षण आणि पश्चिमी प्रभावाचे प्रतीक मानले जाते. पण बऱ्याचदा अशा प्रकारच्या मेकअपमुळे दोन व्यक्तींमधील वाद वाढण्याची शक्यता असते.

उत्तर कोरियात महिलांनी फक्त हलक्या रंगांची लिपस्टिक लावावी. परदेशी ब्रँड, गडद रंग आणि भडक मेकअप करणे हे नियमाच्या विरुद्ध आहे, असे मानले जाते.

लाल रंगाची लिपस्टिक लावून फिरणाऱ्या महिलांवर कडक कारवाई केली जाते.






