नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन विध्यार्थी दररोज मंदिरात दर्शनासाठी जात होती. याच दरम्यान मंदिरातील पुजारी कुश शर्मा याच्याशी तिची ओळख झाली. ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले आणि दोघांमध्ये मोबाईलवरून नियमित संवाद सुरु झाला. मैत्री वाढल्यानंतर पुजाऱ्याने विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे आमिष तिला दाखवले. 18 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 1 वाजता आरोपी पुजारी कुश शर्मा याने तिला मेसेज करून घराबाहेर भेटण्यास बोलावले. आरोपीच्या बोलण्याला बळी पडून रात्री सुमारे 2 वाजता घरातील सर्व सदस्य झोपले असताना ती कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. त्या वेळी आरोपी रस्त्यावर उभा होता. त्याने तिला आपल्या खोलीत नेले आणि तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. एवढेच नाही तर या घटनेची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पुजारी कुश शर्मा हा कधी कधी विद्यार्थिनीच्या आईच्या मोबाईलवरही फोन करून बोलत असल्याने कुटुंबीयांनाही त्याच्याबाबत फारसा संशय वाटला नाही.
आरोपीला पुजारीला अटक
घटनेनंतर विद्यार्थिनीने घाबरलेल्या अवस्थेत घरी परतली. काही काळानंतर तिने धैर्य एकवटून आपल्या आई व भावाला घडलेला प्रकार सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी तिला अकोदिया पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला. आरोपीला अटक केली आहे. आरोपी पुजारी हा अकोदिया रेल्वे स्थानकासमोर असलेल्या हनुमान मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत आहे. तो मंदीर परिसरातील घरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Ans: मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील अकोदिया पोलीस ठाणे हद्दीत 18 डिसेंबर रोजी रात्री ही घटना घडली.
Ans: मंदिरात ओळख वाढवून प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवत आरोपी पुजाऱ्याने तिला विश्वासात घेतले.
Ans: रात्री मेसेज करून भेटीस बोलावून आरोपीने तिला आपल्या खोलीत नेले आणि जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला.






