धक्कादायक ! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; एकाच महिन्यात तीनवेळा... (iStock)
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता अमरावतीत एक धक्कादायक घटना घडली. दिव्यांग अल्पवयीन मुलीवर घरात शिरून दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला. ही गंभीर घटना शनिवारी (दि. २०) उघडकीस आली.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. पीडिता अलीकडील काळात शाळेत गप्प राहू लागली होती. ही बाब शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर तिने पीडितेच्या आईला माहिती दिली. त्यानंतर आईने शाळेत येऊन मुलीशी विश्वासाने संवाद साधला. त्यावेळी पीडितेने एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्ट्या सुरू असताना, घरात कोणी नसताना घराच्या जवळच राहणाऱ्या दोन तरुणांनी घरात येऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…
दरम्यान, त्याच महिन्यात तीनवेळा हा प्रकार घडल्याचे तिने आईला सांगितले. ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने नमूद केले. यानंतर पीडितेच्या आईने पथ्रोट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
महिला डॉक्टरवर अत्याचार
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर येथे महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. आरोपी अमरनाथसोबत इन्स्टाग्रामवर पीडितेची ओळख झाली होती. काही दिवसांतच दोघांमध्ये संपर्क वाढला. त्यातून मैत्रीचे नाते घट्ट होत असताना आरोपीने तिचा गैरफायदा घेतला. शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचे फोटो-व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.
हेदेखील वाचा : Madhyapradesh Crime: अल्पवयीन मंदिरात दर्शनासाठी गेली आणि नको ते घडलं, पुजाऱ्याने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले नंतर…






