Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हीप म्हणजे नेमके काय? कधी लागू होतो आणि त्याचे उल्लंघन केल्यास काय होते? जाणून घ्या नियम

राजकारणात वारंवार चर्चेत असलेला 'व्हीप' म्हणजे नेमके काय, तो कधी जारी केला जातो आणि त्याचे उल्लंघन केल्यास काय परिणाम होऊ शकतात? संसद आणि विधानमंडळातील पक्षशिस्त राखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या संसदीय व्यवस्थेचे नियम, प्रकार आणि पक्षांतरविरोधी कायद्याशी असलेला संबंध जाणून घ्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 18, 2026 | 02:30 PM

व्हीप म्हणजे नेमके काय? कधी लागू होतो आणि त्याचे उल्लंघन केल्यास काय होते? जाणून घ्या नियम

Follow Us
Follow Us:
1 / 8

राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने व्हिप जारी केले. आता व्हीप जारी केल्यानंतरही पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्या खासदारांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पण व्हीप कधी लागू होतो? त्याचे नियम काय आहेत?

2 / 8

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून 18 जून रोजी दिल्लीत बोलावण्यात आलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला 'व्हीप' (Whip) जारी करूनही लोकसभेच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी दांडी मारली आहे.

3 / 8

"दहाव्या परिशिष्टानुसार अपात्रतेची कारवाई प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर लागू होते. एक म्हणजे त्या पक्ष नेतृत्वाचा व्हीप असतो त्याचे उल्लंघन केले तर अपात्रता लागू होते. दुसरा मुद्दा म्हणजे दोन तृतीयांश पेक्षा जास्त निवडून आलेले प्रतिनिधी हे दुसऱ्या पक्षात सामील होत असतील तर अपात्रता लागू होत नाही."

4 / 8

मात्र राजकारणात 'व्हीप' (Whip) म्हणजे काय? राजकीय पक्षाने आपल्या आमदार किंवा खासदारांना सभागृहात उपस्थित राहून विशिष्ट भूमिकेच्या बाजूने किंवा विरोधात मतदान करण्यासाठी जारी केलेला अधिकृत लेखी आदेश म्हणजे व्हिप... ब्रिटिश संसदीय परंपरेतून ही संकल्पना भारतात आली आहे.

5 / 8

प्रत्येक राजकीय पक्ष संसद किंवा विधानमंडळात आपला मुख्य प्रतोद (Chief Whip) किंवा प्रतोद नियुक्त करतो.

6 / 8

एक ओळीचा व्हीप (One-Line Whip) म्हणजे सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्याची सूचना दिली जाते. उपस्थिती महत्त्वाची असते, पण मतदानाबाबत बंधनकारक निर्देश नसतात.

7 / 8

दोन ओळींचा व्हीप (Two-Line Whip) म्हणजे सदस्यांनी उपस्थित राहून चर्चेत सहभागी व्हावे, असा निर्देश असतो. महत्त्वाच्या विषयांवर हा व्हीप दिला जातो.

8 / 8

तीन ओळींचा व्हीप (Three-Line Whip) म्हणजे सर्वात कडक प्रकारचा व्हीप असतो.सदस्यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहून पक्षाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान करणे आवश्यक असते. विश्वासदर्शक ठराव, अविश्वास प्रस्ताव, अर्थसंकल्प किंवा अत्यंत महत्त्वाच्या विधेयकांवेळी हा व्हीप जारी केला जातो.

Web Title: What is political whip when it applies and rules in indian politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
1

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
2

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
3

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
4

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.