Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा

Eknath Shinde : नांदेडमधील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना त्यांनी कारवाईचा इशारा दिला.

  • By विवेक
Updated On: Nov 01, 2026 | 08:29 PM
Eknath Shinde

Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • नांदेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या हस्ते विकासकामांचं उद्घाटन
  • शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा
  • ‘शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कठोर कारवाई’
 

नांदेड : राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न होत असून दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रीम मदतदेखील सरकारकडून करण्यात आली आहे. अश्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यांना त्यांनी थेट इशारा दिला आहे. (Eknath Shinde)

नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी फायनान्स कंपन्यांना सक्त ताकीद देत ‘शेतकऱ्यांना त्रास देऊ नका नाहीतर तुम्हाला आडवं करू,’ असा इशारा दिला आहे.

नांदेडमध्ये विकासकामांचं उद्घाटन

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार अशोक चव्हाण, हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

यावेळी बोलताना शिंदे यांनी नांदेडच्या विकासकामांसाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा आणि चारा व्यवस्थेच्या कामांचाही त्यांनी उल्लेख केला.

मायक्रो फायनान्स कंपन्यांना शिंदेंचा दम

कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीचा मुद्दा उपस्थित करत शिंदे म्हणाले की, आधीच दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी त्यांच्यावर दबाव टाकू नये.

‘शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवं करू,’ असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 हजारांची अग्रीम मदत

दुष्काळामुळे शेतकरी संकटात असल्याचं सांगत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याची तरतूद आहे. या मदतीसाठी सरकारने 7,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

यावेळी विरोधकांवर टीका करताना शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं ठामपणे सांगितलं. महिलांना मिळणारा दीड हजार रुपयांचा लाभ सुरू राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तसंच शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सामूहिक विवाह मेळावे आयोजित करण्याची माहितीही त्यांनी दिली. दिवाळीच्या काळात शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा, केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: एकनाथ शिंदे यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांना काय इशारा दिला?

    Ans: शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

  • Que: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळणार आहे?

    Ans: पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रीम आर्थिक मदत दिली जाणार आहे. 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील 33 टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

  • Que: एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत काय सांगितलं?

    Ans: लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. महिलांना दरमहा मिळणारा दीड हजार रुपयांचा लाभ सुरू राहील, असं त्यांनी सांगितलं.

Web Title: Eknath shinde warning microfinance companies farmers nanded vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • drought news
  • Eknath Shinde
  • Farmer Issue
  • nanded news

संबंधित बातम्या

Wardha News : उन्हाळ्यात वर्ध्याची तहान कशी भागणार? ११ धरणांत फक्त ‘इतकाच’ पाणीसाठा, वर्धेकरांनो, आतापासूनच पाणी जपून वापरा
1

Wardha News : उन्हाळ्यात वर्ध्याची तहान कशी भागणार? ११ धरणांत फक्त ‘इतकाच’ पाणीसाठा, वर्धेकरांनो, आतापासूनच पाणी जपून वापरा

Young India Marathon : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता; तरीही लवप्रित, रविनाची विजयी भरारी
2

Young India Marathon : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता; तरीही लवप्रित, रविनाची विजयी भरारी

Sharad Pawar Drought Tour : शरद पवारांचा दुष्काळग्रस्तांसाठी मोठा निर्णय! तुळशी गावात पोहोचताच केली ५० लाखांची मदत
3

Sharad Pawar Drought Tour : शरद पवारांचा दुष्काळग्रस्तांसाठी मोठा निर्णय! तुळशी गावात पोहोचताच केली ५० लाखांची मदत

Sharad Pawar Drought Tour : शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार
4

Sharad Pawar Drought Tour : शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.