Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News :- नांदेडमध्ये वाडी रुग्णालयाचे लोकार्पण; शेतकऱ्यांना मदतीचे वाटप…

वाडी उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, चारा-पाणीपुरवठ्याचा शुभारंभ करत एकनाथ शिंदेंची ग्वाही.५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली असून ही अंतिम मदत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांनी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये, धीर सोडू नये,

  • By Dilip Bane
Updated On: Nov 02, 2026 | 01:07 PM
Nanded Drought, वाडी उपजिल्हा रुग्णालय,

Nanded Drought, वाडी उपजिल्हा रुग्णालय,

Follow Us
Follow Us:
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाडी उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण.
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना गुरांसाठी चारा वाटप आणि टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे उद्घाटन.
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरित.
  • महिलांना शिलाई मशीन आणि विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप.
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची एकनाथ शिंदे यांची ग्वाही.
  • दिवाळीपूर्वी सरकारकडून ५ हजार रुपयांची तातडीची मदत.
  • कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.
नांदेड इथे बु. जिल्ह्यातील वाडी उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना गुरांसाठी चारा वाटप तसेच पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या मदतीचे धनादेश देण्यात आले. महिलांना शिलाई मशीन तसेच विद्यार्थिनींना सायकलचे वितरणही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मंत्रिमंडळाने दिले असले तरी त्यांच्यासाठी दुष्काळग्रस्त परिस्थिती नक्कीच भयावह आहे. दिवाळीच्या तोंडावर तातडीने ५ हजारांची मदत सरकारकडून करण्यात आली असली तरी ती मदत अंतिम नाही, असे सांगण्यात आले आहे.

सरकारने जाहीर केलेली ५ हजाराची मदत जास्त नाही !

ही मदत फार नाही, हे सुद्धा सरकारला माहिती असेल. म्हणूनच ते शेतकऱ्यांना साद घालत आहेत की, कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नका तसेच धीर सोडू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. नक्कीच काही ना काही तरी मार्ग सापडेल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी या गोष्टीचीही हमी दिली आहे की, जर कोणी या कठीण काळात कर्जवसुलीसाठी त्रास देत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी या प्रसंगी दिला.

Cabinet Meeting Decision: १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नांदेड इथे बु. जिल्ह्यातील वाडी लोकार्पण सोहळ्यात मान्यवर लोकं उपस्थित होते.

या प्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, तसेच माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम-कोहळीकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर, आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, महापौर कविता मुळे, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

Farmers Death: धक्कादायक वास्तव! राज्यात 13928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबांना अद्याप मदतीची प्रतीक्षा

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाडी उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण कोणी केले?

    Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

  • Que: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणत्या सुविधा सुरू करण्यात आल्या?

    Ans: गुरांसाठी चारा वाटप आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

  • Que: शेतकऱ्यांना सरकारकडून किती तातडीची मदत देण्यात आली?

    Ans: दिवाळीच्या तोंडावर ५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली.

  • Que: शेतकऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी काय आश्वासन दिले?

    Ans: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे आश्वासन दिले.

Web Title: Eknath shinde assurance to drought affected farmers nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra farmers
  • nanded news

संबंधित बातम्या

Young India Marathon : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता; तरीही लवप्रित, रविनाची विजयी भरारी
1

Young India Marathon : दमट हवामान, चढ-उताराचा रस्ता; तरीही लवप्रित, रविनाची विजयी भरारी

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
2

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा

पाचशे कोटींची ‘ती’ ऑडिओ क्लिप ठरतेय चर्चेचा विषय; तपासाकडे लागले सर्वांचे लक्ष
3

पाचशे कोटींची ‘ती’ ऑडिओ क्लिप ठरतेय चर्चेचा विषय; तपासाकडे लागले सर्वांचे लक्ष

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला
4

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.