सकाळी किती वाजता उठणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं? चुकीच्या सवयी सोडा, हेल्दी लाइफस्टाइलसाठी आजपासूनच करा बदल
विज्ञान सांगतं की, सकाळचा ५ ते ६.३० हा काळ उठण्यासाठीचे सर्वाेत्तम वेळ आहे. दररोज यावेळेत उठण्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. अनेक जण सकाळी लवकर उठून माॅर्निंग वाॅकला जतात, यामुळे तन-मन दोन्हीही निरोगी राहतात.
जे लोक सकाळी ११-१२ वाजता झोपतात त्यांची ही सवय त्यांच्या आरोग्यावर वाईट परीणाम करत असते. अशात मग सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती याबाबत अनेकांना प्रश्न आहेत, चला तर जाणून घेऊया.
तज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही सकाळी लवकर सूर्याेदयाच्या आसपास जागे होता तेव्ही तुमच्या शरीराची सायकल बिघडते. यामुळे शरीरातील हार्मोन्स, एनर्जी लेव्हल आणि मानसिक आरोग्य यात बिघाड होऊ लागतो. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने शरीराच्या सायकलचा समतोल बिघडतो ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागतात
संशोधनानुसार, सकाळी ५ ते ६.३० च्या दरम्यान उठणे सर्वाेत्तम आहे. यावेळेत ब्रेन वेव्ह्ज ऍक्टिव्ह मोडमध्ये येतात. या वेळेत उठून तुम्ही योगा, ध्यान लावणे किंवा व्यायाम करुन आपल्या मानसिक आरोग्याची निगा राखू शकता
सकाळच्या नैसर्गिक प्रकाशामुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोनचे कमी होऊन कोर्टिसॉल हार्मोन वाढते, ज्यामुळे शरीर ऊर्जावान राहते. आपल्या शरीराला ७-८ तासांची झोप गरजेची असते अशात रात्री १० वाजेपर्यंत झोपून तुम्ही सकाळी लवकर उठू शकता. यामुळे तुमची झोपही पूर्ण होईल
संशोधनानुसार, जे लोक सकाळी ९ ते १० या वेळेत उठतात, त्यांच्यात आळस आणि चिडचिडेपणा भरून राहतो. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात जसे की लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार. याउलट सूर्योदयाच्या आसपास जे लोक उठतात त्यांच्यात सकारात्मकता भरलेली राहते आणि त्यांचे मानसिक आरोग्यही संतूलित राहते