दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये देशाचा अर्थसंकल्प तयार केला जातो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वामध्ये देशाच्या कमाई आणि खर्चाचा लेखाजोखा मांडला जातो. यंदा निर्मला सीतारमण आठव्यांदा बजेट सादर करणार आहे. बजेट तयार करताना हलवा समारंभ केला जातो. यामध्ये अर्थमंत्री सर्वांना हलवा खायला घालत असतात.
Why Halwa ceremony is celebrated before presenting Budget
भारतीय संसदीय परंपरेनुसार, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी हलवा समारंभ केला जातो.
अर्थसंकल्पीय कागदपत्रांची छपाई सुरू आधी हा हलवा समारंभ साजरा केला जातो.
हा हलवा एका मोठ्या पातेल्यात तयार केला जातो. हा गोड पदार्थ मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये वाटला जातो.
अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया गोड व्हावी या हेतूने हलवा समारंभ घेतला जातो.
हलव्याचे वाटप झाल्यानंतर अर्थ मंत्रालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंत्रालयातच रहावे लागते.
अर्थसंकल्प तयार होईपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना संपूर्ण जगापासून दूर राहावे लागते.
या अलिप्त राहिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने बजेट बनवण्याच्या आणि त्याच्या छपाईच्या प्रक्रियेत थेट सामील असणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो.
अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प सादर करेपर्यंत हे कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांशी फोनवरही संपर्क साधू शकत नाहीत.