Insomnia म्हणजेच निद्रानाश ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. बदलती लाइफस्टाइल आणि सततच्या धावपळीमुळे अनेक जणांना पुरेशी झोप मिळत नाही. त्यातही पुरुषांपेक्षा महिलांची झोपमोड सतत होताना दिसत आहे, ज्यामुळे निद्रानाशचा धोका त्यांच्यासंगठी वाढला आहे. एका संशोधनानुसार महिलांमध्ये याचे प्रमाण ५८ टक्के जास्त आहे. पण महिलांची सतत झोपमोड होण्यामागची कारणं काय? चला जाणून घेऊया.
या कारणांमुळे महिलांना निद्रानाशाचा धोका जास्त (फोटो सौजन्य: iStock)
मानसिक ताण: महिलांमध्ये मानसिक ताण आणि चिंता जास्त प्रमाणात आढळतात. कुटुंबाची जबाबदारी, कामकाज आणि इतर गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये मानसिक दबाव वाढतो, ज्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होतो.
सततचे जागरण: स्त्रिया सामान्यत: घराची देखभाल, मुलांची काळजी, इतर जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेल्या असतात, ज्यामुळे त्यांच्यावर रात्री जागरणाची वेळ ओढवते. यामुळे झोपेचा सायकल प्रभावित होतो.
ऑस्ट्रोजनच्या कमीमुळे झोपेवर प्रभाव: मेनोपॉझ नंतर महिलांमध्ये ऑस्ट्रोजन हार्मोन कमी होतो, ज्यामुळे , घाम येणे आणि रात्री जागरणाची समस्या उद्भवू शकते. यामुळे महिलांची झोप मोड होण्याची समस्या अधिक असते.
हार्मोनल बदल: महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणेची स्थिती आणि मेनोपॉझस (वयातील बदल) यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते, जे झोपेवर परिणाम करते. उदाहरणार्थ, गर्भधारणेत गर्भाशयाचा दबाव आणि हार्मोनल बदल महिलांना झोपेत अडचणी आणू शकतात.
शारीरिक दुखणे आणि अडचणी: महिलांना गर्भाशयाचे आजार, पाठीचे दुखणे किंवा इतर शारीरिक समस्यांमुळे झोपेतील अडचणी येत असतात. विशेषतः मासिक पाळी दरम्यान किंवा गर्भधारणेत शरीरातील बदलांच्या कारणाने त्यांना अधिक आरामदायक झोप मिळणे कठीण होऊन बसते.